पुणे

सावधान, क्षमतेपेक्षा मालवाहतूक केल्यास दीडपट दंड 

सकाळवृत्तसेवा

पुणे - क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या दंडात किमान दीडपट ते चौपट वाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) घेतला आहे. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या हलक्‍या, मध्यम आणि जड वाहनांवर यापूर्वी जादा वजनानुसार सरसकट दंड आकारणी होत होती; मात्र आता वजनाच्या प्रमाणात दंड आकारणी होणार आहे. तसेच एकाच महिन्यात पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक असल्यास दंडाची रक्कम वाढत जाणार आहे. चौथ्यांदा क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक झाल्यास संबंधित वाहनाचा परवाना रद्द होणार आहे. 

पहिल्या तिन्ही वेळेस होणाऱ्या कारवाईत दंडाची रक्कम असून, परवाना निलंबित करायचा नसल्यासही तडजोड शुल्काचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हलक्‍या वाहनांना क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करताना 5 हजार किलोपर्यंत किमान दंड 5 हजार आणि त्यापेक्षा अधिक वजनाच्या मालाची वाहतूक केल्यास किमान दंड 7 हजार रुपये होणार आहे. मध्यम मालवाहतूक वाहनांना अनुक्रमे 10 आणि 15 हजार रुपये दंड, तर जड वाहनांना अनुक्रमे 20 आणि 25 हजार रुपये दंड पहिल्या कारवाईत होणार आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात दंडाची रक्कम वाढत जाणार असून, ती कमाल रक्कम 15 ते 75 हजार असेल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अजित शिंदे यांनी दिली. त्यामुळे मालवाहतूकदारांनी क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

युद्धामुळे महागाईचा भडका, सरकारने एक कोटीची नोट छापली, पण बाजारात पिशवीही भरणार नाही; इराणची अर्थव्यवस्था संकटात

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

SCROLL FOR NEXT